
एकातरी, दिघंतरी हा श्वास चालतो मनी
चला चला पुढे जाऊ, जिंकू या रणांगणी
आदर्श आपले जणू पाठी आपल्या आहे
युद्धाच्या रथावरी जणू ते सारथी आहे
मार्ग आपला दिसे, काट्यांनी ही शोभूनी
प्रेरणा हीच आपली, कार्य ते करावया
गतिशील राष्ट्र हो, हीच आपली साधना
शपथ आज घेऊया, भरत भूमी आपली
ध्येय हेची आपले, त्यागते करावया
प्राण मातृभूमीला, हसता हसता देऊया
ह्या मातीच्या गंधात, नाद एक होऊ दे
हृदयातून उभा आज, जयघोष वाहू दे
भगवा उंच आपला
भगवा उंच आपला
हेच राहो अंतरी
हेच राहो अंतरी
ज्ञान आपले जणू
हे विश्वाला ही चालवे
विश्वगुरू बनू आम्ही
विश्वगुरू बनू आम्ही
जननी जन्मभूमीच, स्वर्गाला ही हारवे
मोह हाची आपला, छातीवरून झडावे
मावळ्यांची उर्मी ही, रक्तात आज धावते
कणकणीत निश्चयाने, काळ ही थरथरते
श्रम हेच व्रत आपले, सचोटीचा दीप हाती
एकतेची वीण घेऊन, उभे राहू वेळेवरती
सिंहावलोकन नाही, आगेकूच हीच गाथा
सत्यमार्गी पाऊल ठेवू, हीच आपली प्रार्थना
ध्येय हेची आपले, त्यागते करावया
प्राण मातृभूमीला, हसता हसता देऊया
ह्या मातीच्या गंधात, नाद एक होऊ दे
हृदयातून उभा आज, जयघोष वाहू दे
भगवा उंच आपला
भगवा उंच आपला
हेच राहो अंतरी
हेच राहो अंतरी
ज्ञान आपले जणू
हे विश्वाला ही चालवे
विश्वगुरू बनू आम्ही
विश्वगुरू बनू आम्ही
काट्यांतही फुलू आम्ही
आघातांवर फुलू आम्ही
एक मनी, एक वाचा
एक ध्येय घेऊ आम्ही
या मातीचा अभिमान
शिरशिरीत पेटू दे
भवितव्याची पहाट आज
हातात आपल्या येऊ दे
भगवा उंच आपला
भगवा उंच आपला
हेच राहो अंतरी
हेच राहो अंतरी
ज्ञान आपले जणू
हे विश्वाला ही चालवे
विश्वगुरू बनू आम्ही
विश्वगुरू बनू आम्ही